हल्ली तसं वाचनाचं प्रमाण कमीच झाले आहे असं साऱ्या जुन्या जाणकार लोकांच मत आहे परंतु तसे नाही नवीन पिढी अगदी जुन्या लोकांसारखी पुस्तकांचे बाड घेऊन नसेल वाचत पण kindle वर आणि tablet वर बरीच नामांकित लेखकांची पुस्तके ही मुले वाचतात.
मराठी त एक उक्ती आहे वाचाल तर वाचाल म्हणजे तुम्ही जर वाचत रहाल तरच तुम्हाला सामान्य ज्ञान मिळेल जगरहाटी समजेल अन् या जगात कसं जगायचं ते कळेल म्हणजेच आयुष्याच्या प्रवासात तुम्ही वाईट अन् चुकीच्या गोष्टींपासून वाचाल.
आमच्या लहानपणी शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या कुठे सुवाच्य हस्ताक्षर कुठे निबंध स्पर्धा अशा बऱ्याच अन् या सगळ्यांची बक्षिसे जास्त करून पुस्तके च असायची. मग नवनवीन पुस्तके मिळतात म्हणून आम्ही साऱ्या मैत्रिणी या स्पर्धांमध्ये हिरीरीने भाग घ्यायचो.
लहानपणी या बक्षिस मिळणाऱ्या पुस्तकाचे कोण अप्रूप वाटायचे. मग हळूच त्या नवीन पुस्तकाचा वास घ्यायचा तुम्हाला सांगते तो वास म्हणजे अगदी देव्हाऱ्यात ल्या उदबत्ती सारखा वाटायचा.
नवीन पुस्तक हातात घेतले की पहिल्या पावसाने जसा मातीला गंध येतो अन् एक आल्हाददायक सुवास आसमंतात दरवळतो तशीच काहीशी मनाची अवस्था होई. मेघ दाटून आल्यावर मोर जसा थुईथुई नाचतो तसचं पुस्तक घेऊन घरभर नाचावसं वाटे. नवीन पुस्तक मिळणं म्हणजे मोठं घबाडं गवसण्याइतकचं आनंददायी असे.
खर तरं या साऱ्या झाल्या बालपणी च्या आठवणी. पण अजूनही पुस्तक बघितलं की माझं मन फार तरल होतं ते कधी एकदा घेते अन् वाचते असेच होऊन जाते.
पुस्तका सारखा दुसरा मित्र नाही. तसचं
पुस्तका सारखा दूसरा गुरु ही नाही. बऱ्याचदा आपण दुःखी असतो पण कोणाशी share नाही करु शकत तेव्हा एखादं हलकफुलकं पुस्तक चं आपल्या मित्राची भूमिका पार पाडतं. आपल्याला सारचं येतं असं नाही पण त्या विषयाच्या पुस्तकानेच आपल्या डोक्यातला गुंता सुटतो म्हणजेच पुस्तकचं वेळेला गुरु सारखं धावून येतं.
पुस्तक म्हणजे नुसती
पाने नाहीत काही
पुस्तक म्हणजे कधी गुरु
तर कधी मित्र
पुस्तक म्हणजे ज्ञानाचे
भांडार
पुस्तक म्हणजे गायकाने
आळवलेला राग
पुस्तक म्हणजे नृत्यांगनेच्या
नाचातील पदलालित्य
पुस्तक म्हणजे एखाद्या सुगरणी ने
केलेला पंचपक्वांनांचा मेवा
पुस्तक म्हणजे देव्हाऱ्यातील
देवाला चढविलेला साज
पुस्तक म्हणजे मनुष्याच्या
जीवनातील अनमोल ठेवा
म्हणून च म्हणते
पुस्तकांना जपा
त्यांना वाचा
अन् त्यांचा सन्मान करा
मृणाल वाळिंबे
No comments:
Post a Comment