Wednesday 28 December 2016

मैत्री कट्टा निवांत क्षण 

मारव्याचे एकाकी स्वर 
मावळतीला झालेला सूर्याचा अस्त 
बावरलेल्या संध्याकाळी 
जाणवणारा बोचरा गारवा 
मिट्ट काळोख्या रात्री 
बहरत जाणारा थंडावा 
रक्त गोठवणारी थंडी 
हातपायावर येणारा शहारा 
अशातच अचानक आलेला 
वाफाळलेल्या कॅाफीचा वास 
अन् क्षणार्धात तरळल्या 
साऱ्या जुन्या आठवणी मन:पटलावर 
 गुलाबी थंडीत  
उऱ्तरोऱ्तर बहणाऱ्या 
रात्रीसंगे 
छाटलेल्या त्या गप्पा 
 मैत्रिणींसोबत घेतलेले 
ते कॅाफीचे घुटके 
छान शांत असे 
स्व:तसाठी काढलेले 
ते निवांत क्षण 
हीच तर आहे 
खरी जीवनाची पुंजी 

मृणाल वाळिंबे