Friday 13 July 2012

कळीचे मनोगतं

एक होती छोटीशी कळी
तिला उमलण्याची भारी घाई
हळुवार अलगद ती उमलली
अन् टपोरं फुलं झाली
पाहून आपुले रूप टपोरे
ती झाली भलतीच खुश
अवचित एक भ्रमर आला
तिच्याभोवती फिरू लागला
कळी भ्याली अन् सिकुडली
मग एक पोपट आला
टपोऱ्या फुलावर बसला
कळी आकसली
करु लागली देवाचा धावा
देव प्रकटला अन् म्हणाला
काय गो माझी बाय
कळी थरथरली
अन् म्हणाली
लहानपण देगा देवा
मी आपुली कळीच छान 
उगीच धरून बसले हाव
आता नाही मागणार काय
मला कळले हळूहळू मोठे व्हावे
म्हणजेच आहे   गंमत त्यात


                             मृणाल वाळिंबे