Whatsapp वर एक कविता वाचनात आली अनलिमिटेड. खूप उत्सुकतेने मी ती वाचली त्यातील खूप गोष्टी मनाला भावल्या. त्यातूनच ही पोस्ट लिहिण्याची उर्मी मनात आली.
खर तरं आमच्या वेळी (असं म्हणलं की आजी आजोबांच्या पिढीची प्रर्कषाने आठवण येते) जग इतकं जवळ आलेलं नव्हतं एवढी सारी माहिती मिळवण्याची साधनेही नव्हती इतकी सुबत्ताही नव्हती त्यामुळे च की काय साऱ्याच गोष्टी लिमिटेड च होत्या. अनलिमिटेड शब्दच सहसा ऐकिवात येत नव्हता.
साधाच उदाहरण घ्यायचं झालं तर दूरचित्रवाणी वर सुध्दा इतकी सारी भरमसाठ channels नव्हती त्यामुळे तो सगळ्यांनी एकत्र बसूनच बघितला जायचा अन् त्यातच खूप मज्जा यायची. आताश्या एवढ्या साऱ्या channel मूळे खूप सारे options तयार होतात त्यामुळे प्रत्येक खोलीत tv दिसू लागले आहेत. म्हणून च लहान मुले इतकी tv पाहतात त्याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर अन् एकूणच तब्बेतीवर होतो आहे.
खूप साऱ्या अमर्याद गाड्यांमुळे रस्ते अपुरे पडू लागले आहेत अन् परिणामी रोजरोज वाहतूक कोंडीला देताना मनुष्याची सगळी शक्ती खर्ची पडत आहे.
आपलं मूल सर्वात पारंगत पाहिजे या अट्टाहासापायी त्याला सर्वच क्षेत्रातील क्लास लाऊन त्याची इतकी मुस्कटदाबी केली जाते की त्या मुलाला स्वतःला आपण नक्की कशात निपुण व्हावे हेच कळत नाही अन् त्याची अवस्था 'एक ना धड भाराभर चिंध्या' या मराठी म्हणी सारखी होते आहे.
परवा माझ्या एका क्लासच्या मुलाला मी एक प्रश्न विचारला तर तो म्हणाला आमच्या अभ्यासात नाही मी म्हणाले मागच्याच वर्षी हे होऊन गेले आहे कसे येत नाही? त्यावर तो म्हणाला मँडम google वर search केले की सगळेचं सापडते कशाला हे सारे लक्षात ठेऊन डोक्याची भेंडी करायची. मी निःशब्द काय बोलणार या अर्तक्य logic बद्दल
म्हणून च वाटते खरचं पूर्वी होते ना तेच बरे होते सर्व कसे लिमिटेड असल्यामुळे हातपाय पसरायचा प्रश्नच नव्हता मुळी
काळ बदलला
खूप सारे मागे टाकून
प्रगती पथावर चालला
जग जवळ आले
अन् मनुष्य मात्र दुरावला
दुनियेला कवेत घेता घेता
स्वतःहाचे अस्तित्व मात्र
हरवून बसला
खूप साऱ्या अनलिमिटेड ला
कवटाळताना
लिमिटेड अशा नात्यांना मात्र
पारखा झाला
Facebook whatsapp या
Virtual media वर संवाद
साधता साधता
स्वतःचा स्वःताशी संवादच
खुंटला
जगातल्या साऱ्या अनलिमिटेड
गोष्टींना घाला गवसणी
मात्र लिमिटेड आयुष्यातच
मृणाल वाळिंबे
No comments:
Post a Comment