आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक माणूस इतका बिझी झाला आहे की त्यास स्वतः कडे लक्ष देण्यास वेळच नाही मग तो इतरत्र काय बघणार?
आज सकाळी morning walk ला एक जुनी शाळेतील मैत्रीण भेटली. अर्थातच खूप वर्षांनी भेटल्यामुळे आम्ही रस्त्याच्या कडेला उभे राहून बोलत होतो जसं पु . ल म्हणतात दोन मुंग्या दोन बायका अन् दोन ट्रक ड्रायव्हर एकमेकांना भेटले की काहीतरी बडबड केल्याशिवाय पुढे जातच नाहीत अगदी तसेच. आजूबाजूनी morning walk ला जाणारे येणारे आमच्या कडे हर तऱ्हेच्या नजरेने कुणी आसूयेने कुणी विस्मयाने असे बघत होते पण आम्ही आमच्याच बालपणीच्या विश्वात रमलो होतो. इतक्या त घड्याळ्याकडे लक्ष गेले अन् फारच उशीर होत असल्याचा संदेश मेंदू देऊ लागला मग गप्पा आवरत्या घेऊन परत एकमेकींना भेटण्याचे ठरवून आम्ही निघालो अन् लक्षात आले आपण एकमेकींचे फोन नंबर च घेतले नाहीत मग पुन्हा हाक मारुन फोन नंबर exchange चा सोहळा पार पडला. मी असे म्हटले कारण दोघीही आपपले नंबर मोबाईल मधे बघूनच एकमेकींना देत होतो.
किती ही memory ची दुरावस्था. Technology प्रगत झाली पण आमची आठवण्याची कला मात्र अप्रगत झाली. त्यातूनच password ची लिस्ट करा स्वतःचे मोबाईल नंबर बँकेचे अकांऊट नंबर एकत्र लिहून ठेवा यासारख्या साऱ्या गोष्टी चालू झाल्या.
या सर्वांचे उत्तर मात्र एकच खूप सारी व्यवधाने आहेत वेळच अपुरा पडतो काय काय लक्षात ठेवणार. पण तुमच्या एक लक्षात येत नाही की आपली मागची पिढी सुध्दा खूप काम करायची त्यांच्या वेळेला तर कुठलीही electronic gadgets उपलब्ध नव्हती आता जशी ती "क्या हुकूम है आका" म्हणत २४तास तुमच्या दिमतीला असतात तशी. त्यांच्या कडे एवढे गाडी घोडेही नव्हते की कुठल्याही कामासाठी त्यांना पायपीट च करावी लागायची वेळही जास्त लागायचा पण तरीही त्यांची memory शाबूत रहायची.
आता आपण technology चे गुलाम झालो आहोत त्यामुळे काही अडले की google आलेच मदतीला धावून थोडाही स्मरणशक्ती ला ताण द्यायला आपल्याला जमत नाही.
अरे वेड्यांनो , साधी लोखंडी कढई खूप दिवस वापरली नाही की त्यावर गंज चढतो आपले आता तेच होऊ लागले आहे विचार करायची आठवण्याची शक्ती लोप पावत चालली आहे. आपण वेळ नाही घाई आहे कुठे बुद्धिला ताण द्या म्हणून हा जो सोयीचा अन् आळशी पणाचा मार्ग जोपासत आहोत ना तोच आपला घात करतो आहे. त्यामुळे वेळीच जागे व्हा technology चा वापर करा पण जिथे गरज आहे तिथेच नाही तर एक दिवस स्वतःचे नाव सांगण्यासाठी सुध्दा मोबाईल बघायला लागायची वेळ येईल आपल्यावर.
माणूस आठवणींचा भुकेला
प्रेमासाठी आसुसलेला
माणूस नवनवीन गोष्टींना
झटक्यात आत्मसात करणारा
माणूस असा प्राणी ज्याला
आहे मन
ज्याला आहेत भावना
ज्याला आहे मेंदू
जुनं साठविण्यासाठी
अन् नवं शिकण्यासाठी
मेंदूचं तर आहे जो
टिकवतोय खरं त्याचं अस्तित्व
जगवतोय मनुष्याला
त्याच्या मनासमं
अन् तोच तर ठरवतोय
त्याचं वेगळेपणं
म्हणूनच म्हणते
स्वतःला न विसरण्यासाठी
थोडी तरी द्या बुध्दिला चालना
औट घटकेसाठी तरी
तरच वाचवू शकाल स्वतःला
Short memory च्या या विळख्यातून
मृणाल वाळिंबे
No comments:
Post a Comment