आयुष्याची संध्याकाळ
आयुष्याच्या संध्याकाळी
मी हिशोब मांडला
काय कमावलं अन्
काय गमावलं
कमावलं पुष्कळ धन,
संपत्ती, ऐश्वर्य
गमावलं मात्र सुखं, प्रेम,
आपुलकी
आयुष्यात तरण्यासाठी मी
धन कमवत गेलो
आयुष्य वेचत गेलो
मात्र स्वजनांना दुरावत गेलो
आता वाटे मज चार क्षण
हातात आहेत
मौज करु यात
आप्तजनांना सुखं देऊ यात
पण,
ते तर केव्हाच पुढे निघून
गेलेत
अन्
मीच एकटा काठावर
उभा आहे
बेरीज ,वजाबाकीचा हिशेब
जुळवत
मृणाल वाळिंबे
No comments:
Post a Comment