माणूस - एक अजब रसायन
माणूस एक तीन अक्षरी शब्द साधा सोपा सरळ पण या तीन अक्षरांत खूप काही समावलेल आहे.
माणूस म्हणजे सजीव ज्याला चेतन अचेतन संवेदना आहेत. ज्याला एक तरल हळुवार मन आहे.
ज्याला डोळ्यांवर असलेल्याला डोक्यात बुद्धी आहे. जिचा वापर तो स्वतःच्या भल्यासाठी करु शकतो.
या माणूस नावाच्या प्राण्यात ब्रम्हदेवाने एक अजब रसायन घातले आहे. जे मन आणि व्यवहार यांची गल्लत करत नाही. अशा या माणसाची कहाणी तो जन्माला आला कि चालू होते अन् मरण पावला कि त्याच्यापुरती संपते. या माणसाला एक संवेदना देवाने जास्त दिली ती म्हणजे गर्व . "स्व" चा फाजील अभिमान . त्यामुळेच कुठलेही कृत्य हातून घडले की "मी केले" अशीच त्याची वल्गना पण खरं तर त्याच्या कृत्यामागे भगवंतच असतो तोच ते त्याच्याकडून करवून घेतो अगदी "कळसूत्री" बाहुलीप्रमाणे म्हणूनच माणसाने जन्मात परोपकार करावा, पुण्य मिळवावे अन् जमलेच तर अहंकार विसरून कर्म करावे जे देवाच्या चरणी रुजू होते. अशा या मानवरूपी मर्त्य माणसाला माझा सलाम.
माणूस
माणूस एक अजब रसायन
त्याला आहे मन अन् शरीर
मनाचा गाभारा भावना दडविण्यासाठी
अन् शरीर फक्त थकेपर्यंत चालण्यासाठी
माणूस हा तर सचेतन, बुद्धिवादी
म्हणूनच तर त्याला लागते घालायला
आयुष्याची सांगड कर्तव्याशी
माणूस हा खरं तर मर्त्य
पण कर्तुत्वाने होतो तो अजरामर प्राणी
माणूस असतो गुण अन् दुर्गुणांची मिसळ
जेव्हा दुर्गुण हवि होतात गुणांवर
तेव्हा होतो तो हैवान
अन् गुणच जेव्हा दुर्गुण मारतात
तेव्हाच होतो जन्म देवाचा
देवत्व असते माणसात
त्याच्या चांगुलपणात
त्याच्या सत्कृत्यात
त्याच्या सत्कर्मात
असा हा माणूस
एक निराळाच प्राणी
दोन पायांचा
मृणाल वाळिंबे

No comments:
Post a Comment