पराभव
पराभव म्हणजे लौकिक अर्थाने
नापास
पराभवरुपी सागरात तरण्यासाठी
तुमची इच्छाशक्ती लागते प्रबळ
पराभव असतो क्षणिक
त्यासाठी कशाला त्रागा
पराभव पचवावा
अन_ त्याचा शोक न करता
नवीन वाट शोधावी
हवीहवीशी , जय मिळवून देणारी
विजय झाला की
प्रगती खुंटते
पण पराभवात मात्र
माणसाला खूप दिशा मिळतात
म्हणूनच त्याची प्रगती वाढते
वाऱ्यासारखी झपाट्याने
अन_ त्या प्रगतीचा होतो
महावृक्ष
कुठल्याही वादळाला न भिणारा ,
न उन्मळून पडणारा,
म्हणूनच म्हणतात ,
पराभव हीच यशाची
पहिली पायरी
मृणाल वाळिंबे
No comments:
Post a Comment