आई तुझी आठवण
आई म्हणजे मूर्तिमंत माउली
घाले सदैव मायेची सावली
असे कर्तव्यतत्पर अन_ उत्साही
धावे सदैव दुसऱ्यांसाठी
म्हणे करावे कर्म मनःशांतीसाठी
धरावी कास सत्याची
ठेवावा विश्वास भगवंताच्या चरणाशी
आई म्हणजे ज्ञानाचा झरा
मायेचा ओलावा
आई म्हणजे खळखळता झरा
उत्साह अन_ आनंदाचा
आई म्हणजे हृदयाची हाक
निःशब्द जाग
आई म्हणजे क्षमेची मूर्ती
मुलांचे अपराध पोटात घालणारी
आई होती परोपकारी
स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगत राहणारी
आई तुझी आठवण येते
तू आहेस माझ्या चराचरात
सदैव तेवत माझ्या मनात
मृणाल वाळिंबे
Very touching...
ReplyDelete