Tuesday, 26 July 2016

आयुष्य

आयुष्य आहे प्रेमाचं गाणं
प्रत्येक हदयाने गावे असं
आयुष्य आहे आनंदाचा झरा
प्रत्येक मनाने फुलवावा असा
आयुष्य आहे तृप्तीचं लेणं
प्रत्येकाने अंगावर लेवावं असं
आयुष्य आहे इच्छांचा डोहं
प्रत्येकाने त्यात बुडावं असा
आयुष्य आहे मनातल्या गर्भित
    
संचाचा महामेरु
प्रत्येकाने काळजात दडवावा असा
आयुष्य आहे समाधानाचा सागर
त्यात डुंबाव
अन् त्याचा आनंद उपभोगावा असा
आयुष्य आहे मानला तर मोद
न मानला तर गम
आयुष्यात सुखाच्या हिंदोळ्यावर
बसा
अन् जीवन मदमस्त तानेवर
जगा
    
मृणाल वाळिंबे

गुरु

गुरु म्हणजे तेज
ज्याने अंधकार होतो नाहिसा
गुरु म्हणजे मार्ग
अडचणीतून बाहेर येण्याचा
गुरु म्हणजे आश्वासक हात
सदैव  पाठीशी असलेला
गुरु म्हणजे वाटाड्या
बोट धरून चालायला शिकवणारा
गुरु म्हणजे स्फूर्तीचं द्योतक
योग्य पाऊल वाट दाखविणारा
गुरु म्हणजे आशेचं प्रतीक
महत्वाकांक्षा जागृत करणारा
गुरु च असतो मात्र
कान पकडणारा
अन् भरकटलेल्याला
ताळ्यावर आणणारा
म्हणूनच म्हणतात
गुरु म्हणजे कृपेची सावली
गुरु म्हणजे साक्षात माऊली
गुरु विन पोरकी ही मनुष्य जाती
          
मृणाल वाळिंबे

आयुष्यात एकदा तरी



आयुष्यात एकदा तरी
भरभरून जगावे
सारी बंधने झुगारून
स्वच्छंदी फुलपाखरासमं विहरावे
आयुष्यात एकदा तरी
मनसोक्त हसावे
दु:खांना बाजूला सारून
सुखांना कवेत घेऊन बहरावे
आयुष्यात एकदा तरी
स्वत:साठी जगावे
आजूबाजूची परिस्थिती झुगारून
मनातल्या स्पंदनांना बाहेर काढावे
आयुष्यात एकदा तरी
स्वत:वरच प्रेम करावे
सारी नाती विसरून
स्वत:तल्या सुप्त गुणांना वाव द्यावा
आयुष्यात एकदा तरी म्हणावे
जगणे खूप सुंदर आहे
अन्  या सुंदर जीवनाचा मी
शिल्पकार आहे

       
मृणाल वाळिंबे

Thursday, 12 May 2016

Hi This is my new creation of Multicolored Crochet Purse:
Created using glossy threads of vibrant color, zip lock, and metal handle with Brass color. .

नातं

नात्याला असावा गंध बकुळीचा
सुकला तरी सुवास दरवळणारा
नात्याला असावा बंध मनाचा
नसावा त्याला वास हेवादाव्याचा
नात्याला असावी चंदनाची काया
झिजली तरी सुगंध पसरवणारी
नात्याला असावा स्वाद अमृता चा
एकच थेंब आयु्ष्याला पुरणारा
नातं असावं आपुलकीचं
जणू काही दुधात मिसळलेल्या
शर्करेसमं
नातं असावं घट्ट विणलेलं
आपुलकीच्या धाग्यां नी
नसावं त्याला कसलं कोंदण
वय जात धर्माचं
असचं नातं फुलवावं
अन् आयुष्यभरं निभवावं

Wednesday, 31 July 2013

मैत्री

                  

मैत्री असावी पाण्यासारखी 
         निर्मळ, नितळ, स्वछ जशी
मैत्री असावी समुद्रासारखी 
         उधाण आलेल्या बेधुंद लाटच जशी
मैत्री असावी घनदाट वृक्षासारखी
          थकलेल्या जीवाला सावली देणारी
मैत्री असावी स्वच्छंदी
           फुलपाखरासारखी 
मैत्री असावी नात्यांपलीकडची
             जात, धर्म,वय, भाषा न झुगारणारी
मैत्री असावी अशी 
                की शब्दांत न मांडता येणारी
पण सुखं दु:खात नि:शब्द साथ देणारी
               अन् चिरंतन टिकणारी


Wednesday, 24 July 2013

मोहिनी

                  

तुझ्या श्वासांच्या गरम उसासांमध्ये
                          मी हरवून जातो
तुझ्या गालावरची खळी
                मला वेडावून जाते
तुझ्या तरल डोळ्यांतील भाव 
                 मला खुणावत राहतो 
तुझ्या पापण्यांची उघडझाप
               मला मोहूनच टाकते
अशी तू माझ्या मनातील 
             कोपऱ्यात घर करून राहते
अशी तू माझी प्रेरणा होऊन 
                 मला साथ करते
अशी तू लाजरी, अबोल
                 मला नेहमीच मत्रंमुग्ध करते
अशा तुला काय म्हणावे 
                 प्रेरणा , भास, की मोहिनी 
हेच कळेना मला?