Thursday, 2 August 2012

संसारी लोणच

संसारी लोणच
आधी करकरीत
अन् मुरल की हवहवसं
साऱ्या कुटुंबाने मिळून
हे लोणच घालावं
पण
कडवट  शब्दांची मेथी
वापरावी जपून
नाहीतर
ती उडते तडतडा फोडणीतल्या
मोहरीप्रमाणे 
जिभेचा तिखटपणा आवरला
तर लोणच राहत खंमग
पण
होत नाही झणझणीत
अन् हे लोणच नासू नये
म्हणून
सहनशक्तीच मीठ
मात्र वापराव भरपूर
अस हे संसारी लोणच
कधी आंबट  कधी गोडं
कधी तिखट कधी खारट
पण असत मात्र हवहवसं
अन् जिभेवर रेगाळणार


                      मृणाल वाळिंबे


           

No comments:

Post a Comment